पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:27 IST2025-07-01T14:27:00+5:302025-07-01T14:27:19+5:30
मार्च २०२४ साली पत्नीला प्रियकर लादूराम घरातून पळवून घेऊन गेला होता. ज्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती.

पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच...
जयपूर जिल्ह्यातील रेनवाल परिसरात एक विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात पतीने हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. याबाबत पतीने स्थानिक पोलीस स्टेशनला धाव घेतली. पत्नी आणि लादूराम नावाचा युवक मिळून मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत आहेत असं पीडित पतीने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
पोलीस तक्रारीत पतीने म्हटलंय की, २२ जूनच्या रात्री हा प्रकार घडला. रात्री १२.३० च्या सुमारास मी झोपलो होतो तेव्हा घरात कुणी तरी आल्याची चाहूल लागताच माझी झोप मोडली. त्यानंतर मी एका खोलीत डोकावून पाहिले तेव्हा माझी पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत लादूरामसोबत बेडवर दिसली. जेव्हा मी त्या दोघांना विरोध केला तेव्हा पत्नीने माझा गळा दाबून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लादूराम तिथून पसार झाला. जेव्हा मी आरडाओरड केली तेव्हा घरातील इतर सदस्य धावून आले आणि त्यांनी मला वाचवले. माझ्याशी भांडण करून पत्नी वेगळ्या खोलीत झोपायला गेली होती. मी त्या खोलीत गेलो तेव्हा ती प्रियकरासोबत दिसली असं पतीने सांगितले.
तसेच खूप दिवसांपासून माझी तब्येत खराब आहे. माझी पत्नी खाण्यापिण्यात काही मिसळत असावी अशी मला शंका आहे. या घटनेनंतर जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी घरातील साहित्याचा शोध घेतला तेव्हा कपाटातून सफेद रंगाची पावडर, काही नशेची औषधे आणि सीरिंज जप्त केली. या सर्व गोष्टींचा हळू हळू विष देण्यासाठी वापर केला जात होता असा आरोपही पतीने पत्नीविरोधात केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा अनेक सत्य उघड झाले. मार्च २०२४ साली पत्नीला प्रियकर लादूराम घरातून पळवून घेऊन गेला होता. ज्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु काही दिवसांनी ती माहेरच्या लोकांसोबत परतली. आता पती भंवरलालने पत्नी आणि तिचा प्रियकर लादूरामविरोधात हत्येचा कट रचल्याचा आणि अनैतिक संबंध असल्याचा पत्नीवर आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मेडिकल चाचणी आणि जप्त साहित्यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.