शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 21:59 IST

दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षाही ठोठावण्यात आली.

ठळक मुद्दे तीन हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.शेख अहमद शेख आझाद (२५) हा एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत विनयभंग केला

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवीत एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.

शेख अहमद शेख आझाद (२५) हा एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत असे यासोबतच ती रस्त्याने जात असताना तीचा हात पकडले यासह विविध प्रकारे त्याने या अल्पवयीन मुलीचा छळ सुरु केला होता. ही मुलगी १८ सप्टेंबर २०१४ रोजी रस्त्याने जात असतांना आरोपी शेख अहमद याने तीचा पाठलाग करून रस्त्यात अडवीले त्यानंतर विनयभंग करून अश्लील वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या या अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगीतला. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने खदान पोलिस ठाणे गाठून शेख अहमद याच्याविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी शेख अहमद याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्रन्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयात झाली. त्यांच्या न्यायालयाने सरकार पक्षातर्फे पाच सक्षीदार तपासल्यानंतर न्यायाधीशांनी कलम ३५४ (ड) अन्वये शेख अहमद यास दोषी ठरवीले. या गुन्हयात त्याला एक वर्ष साधी कैद आणि तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षाही ठोठावण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसMolestationविनयभंगAkolaअकोला