Italian drug mafia is caught after police saw his cooking videos on youtube | बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!

बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!

इटलीमध्ये एक ड्रग माफिया त्याच्या पदार्थ बनवण्याच्या आवडीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. साउथ इटलीमधील मोठा पॉवरफुल माफिया गॅंगचा  सदस्य मार्क फेरेन क्लॉयड बियार्ट नेहमीच त्याच्या यूट्यूब चॅनलवर चेहरा लपवून कुकिंग करत होता. पण पोलिसांना या माफियाच्या एका व्हिडीओवर संशय आला आणि त्यांनी त्याला अटक केली

५३ वर्षीय मार्क माफिया गॅंग Ndrangheta चा सदस्य आहे. ही संस्था कोकेनच्या बिझनेसमध्ये मध्यस्ती म्हणून काम करते आणि अनेक क्रिमिनल ग्रुप्सना ड्रग्स विकते. रिपोर्टनुसार, चुका झाल्यावर ही संस्था आपल्या सदस्यांना जीवे मारण्यासाठीही ओळखली जाते. इटलीतील पोलीस प्रशासन ग्लोबल  पोलीस संस्था इंटरपोलसोबत काम करत आले आहे.

गेल्या एक दशकात इंटरपोलसोबत मिळून इटली पोलिसांनी या क्रिमिनल संस्थेवर अनेक अ‍ॅक्शनही घेतल्या आहेत. मार्कची अटकही यातील एक मोठं पाउल मानलं जात आहे. दरम्यान मार्कला मिलानच्या मालपेंसा एअऱपोर्टहून अटक केली गेली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर मार्कचं कुकिंग चॅनल शोधू शकले होते. पण त्याचा चेहरा दिसत नसल्याने पोलीस हे स्पष्ट सांगू शकत नव्हते की, हे मार्कचचं चॅनल आहे.

मात्र, एका व्हिडिओत मार्कच्या हातावरील टॅटू पोलिसांना दिसला आणि तो त्यांनी ओळखला. त्यानंतर या यूट्यूब चॅनलबाबत अधिक माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर मार्कला अटक केली. रिपोर्टनुसार, इटलीच्या प्रशासनाने २०१४ मध्ये ड्रग ट्रॅफिकिंगच्या आरोपात मार्कला अटक करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर मार्क कोस्टारिकाला पळून गेला होता. तो गेल्या काही वर्षांपासून बोका चिका नावाच्या ठिकाणी राहत होता. हे एक बीच टाउन आहे जे इटालियन लोकांमध्ये लोकप्रिय आहे. पण मार्क आणि त्याची पत्नी आपल्याच देशातील लोकांकडून पकडले जाण्याच्या भीतीने फार जवळ राहत नव्हते. मार्कला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड होती आणि जेव्हाही त्याला संधी मिळत होती तेव्हा तो त्याची कुकिंग रेसिपी यूट्यूबवर शेअर करत होता. पण हेच यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी महागात पडलं.
 

Web Title: Italian drug mafia is caught after police saw his cooking videos on youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.