वारंवार मीडियासमोर बोलणं योग्य नाही, दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने झापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:04 IST2018-09-06T14:11:19+5:302018-09-06T15:04:47+5:30
दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले.

वारंवार मीडियासमोर बोलणं योग्य नाही, दाभोलकर-पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने झापले
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी नवीन आरोपी पकडले म्हणून आधीच्या आरोपींचा तपास न करण्याची चूक करू नका. त्यामुळे दिशाभूल केली जाऊ शकते असे हायकोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, हायकोर्टाने तपास यंत्रणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त केली. अतिउत्सुकता तपासला हानी पोहचवू शकते असे देखील कोर्टाने सांगितले. त्याचप्रमाणे दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने तपास यंत्रणांसह दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांना झापलं आहे. या प्रकरणासंदर्भात वारंवार मीडियासमोर जाऊन बोलणं योग्य नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.
दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अहवाल आज हायकोर्टात सादर करण्यात आला. यावेळी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका असं कोर्टाने एसआयटीला खडसावलं आहे. तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अतीउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येते. अशाप्रकारे माहिती बाहेर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असं कोर्टाने नमूद केलं. पकडलेले आरोपी सुटले तर त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं काय ? असा प्रश्न उपस्थित करत या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.