शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामींसह अन्य आरोपींविरोधात वॉरंट काढा; सरकारी वकिलांचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:08 IST

Anvay naik Case:  पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अलिबागच्या न्यायालयात गुरुवारपासून सुरू झाली आहे. सुनावणीला हजर राहण्याचे आदेश असतानाही आरोपी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढावे, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. 

गोस्वामी यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे, असेही साळवी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत. अर्णब गोस्वामी हे दिल्ली येथे आहेत. कोरोना नियमांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने ही विनंती मान्य केली. 

वकीलपत्रावर आरोपींच्या सह्याच नाहीत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. आरोपींच्या वकिलांनी दाखल केलेल्या वकीलपत्रावर आरोपीची सही नाही. आरोपी वकिलाच्या अर्जावर आम्ही हरकत घेऊ याची कल्पना वकिलांना नव्हती. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज केला आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकCourtन्यायालय