लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:37 PM2021-07-15T19:37:25+5:302021-07-15T19:46:22+5:30

ISI agent selling vegetables near army base : भारतातील गुप्त माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  

ISI agent selling vegetables near army base; like that come into trap | लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड

लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड

Next
ठळक मुद्दे भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा एक तरुण हा चक्क पाकिस्तानच्या ISI चा एजंट असल्याची माहिती मिळाली असून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हबीबूर रहमान असं या व्यक्तीचं नाव आहे. रहमान ही गोपनीय कागदपत्रे कमाल नावाच्या व्यक्तीला देणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राजस्थानच्या पोखरणमधील लष्कराच्या तळापाशी खूप मोठा भांडाफोड झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले. पोखरणच्या लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा एक तरुण हा चक्क पाकिस्तानच्या ISI चा एजंट असल्याची माहिती मिळाली असून त्याला दिल्लीपोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हबीबूर रहमान असं या व्यक्तीचं नाव आहे. भारतातील गुप्त माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  

 

 

रहमान याअगोदर देखील ISIसाठी काम करत होता आणि तो पाकिस्तानला जाऊन आला आहे, असे दिल्लीपोलिसांनी सांगितले. रहमानकडून बरेच गोपनीय कागदपत्रे आणि भारतीय लष्कराच्या योजनांच्या संबंधित काही नकाशे ताब्यात घेण्यात आले.हबीबूर रहमानने दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, ही गोपनीय माहिती आणि कागदपत्रे त्याला आग्रा येथे लष्करी सेवेत रुजू असलेल्या परमजीत कौरने दिली होती. त्यानुसार आता दिल्ली पोलीस हबीबूरसह लष्करी अधिकारी परमजीत कौरची चौकशी करत आहेत. 

 

रहमान ही गोपनीय कागदपत्रे कमाल नावाच्या व्यक्तीला देणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर पोखरण परिसरातून अनेक संशयितांची धरपकड दिल्ली पोलिसांनी केली आहे. त्याचप्रमाणे, हा धक्कादायक प्रकार म्हणजे एखाद्या मोठ्या पाकिस्तानी रॅकेटचा भाग असू शकतो असा संशय पोलिसांनी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, रहमान भाजी विक्रेता म्हणून पोखरण लष्कर तळाच्या आसपासच बसत असे. त्याला काही वर्षापासून लष्कर तळावर भाजी पोहोचवण्याचे कंत्राटदेखील देण्यात आले होते. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रहमानला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: ISI agent selling vegetables near army base; like that come into trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.