शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे गाडीचा हॉर्न वाजविला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:09 IST

अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

चाकण : अरुंद रोडवर गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविले म्हणून व गाडीची चावी काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्या व लोखंडी रॉडने मारहाण करून दोन जणांना जखमी करून गाडीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना शुक्रवारी ( दि. २५ ) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चाकण येथील समाधान बिअर बारच्या पुढे सर्व्हिस रस्त्यावर परदेशी यांच्या भंगाराच्या दुकानासमोर घडली. याबाबत कुणाल गणू लोहार (वय २१, रा. यशवंत कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ) यांनी फिर्याद दिली आहे. या मारहाणीत दिनेश रमेश नाणेकर ( रा. नाणेकरवाडी, चाकण ) व त्यांचे साडू विशाल लक्ष्मण कामठे ( रा. कोहिंडे, ता.खेड ) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीकांत प्रवीण परदेशी, करण प्रवीण परदेशी व विक्रम परदेशी ( सर्व रा. चाकण, ता.खेड, जि.पुणे ) यांच्यासह चार अनोळखी मित्र असा एकूण सात जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०१९ भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४१, १४३, १४७, १४८, १४९ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादीचे मालक दिनेश नाणेकर व त्यांचे साडू विशाल कामठे यांनी अरुंद सर्व्हिस रस्त्यावरून जाताना गाडी पाठीमागे घेण्यासाठी हॉर्न वाजविला असता व त्यांच्या सेलेरिओ गाडीची चावी काढली म्हणून जाब विचारला असता परदेशी व त्यांच्या अनोळखी चार मित्रांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गाडीचे नुकसान केले असल्याची माहिती ठाणे अंमलदार मोघे यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यादव हे पुढील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस