The iron raid fell on the car; The fashion designer saved her life | लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली
लोखंडी राॅड कारवर पडला; फॅशन डिझाईनर सुदैवाने वाचली

ठळक मुद्देया दुर्घटनेनंतर चालकाचेही गाडीवरील नियंत्रण सुटले होते.  हा राॅड कसा पडला आणि कुणाच्या बांधकाम साईटचा आहे. याचा पोलीस शोध घेत आहे.

मुंबई - जोगेश्वरी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कारवर लोखंडी राॅड पडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडीतील फॅशन डिझाइनर महिला थोडक्यात बचावली आहे. या घटनेचा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारवर काही इंचावर हा राॅड पडल्याने महिला बचावली आहे. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो राॅड कारवरून हटवला.

मुंबईत मंगळवारी पावसाचा जोर वाढला असताना गोरेगाव परिसरात राहणाऱ्या रिंकू जैन हिने मुंबईला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बुक केली होती. रिंकू ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. रिंकूची गाडी जोगेश्वरी उड्डाणपूलाखाली आली असताना अचानक गाडीवर उभा लोखंडी राॅड कारच्या पुढच्या काचेतून घुसला. ८ ते १० फूट लांबीचा हा राॅड १६ एमएमचा आहे. रिंकू जैन ही चालकाच्या शेजारीच पुढच्या सीटवर बसली होती. या दुर्घटनेनंतर चालकाचेही गाडीवरील नियंत्रण सुटले होते. मात्र, वेळीच त्याने गाडी नियंत्रित केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, तो राॅड गाडीच्या काचेतून काढला. हा राॅड कसा पडला आणि कुणाच्या बांधकाम साईटचा आहे. याचा पोलीस शोध घेत आहे.

Web Title: The iron raid fell on the car; The fashion designer saved her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.