शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

इकबाल मिर्ची मालमत्ता विक्री प्रकरण : ईडीकडून प्रफुल्ल पटेलांची उद्या होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:40 IST

पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात त्यांना पाचारण करण्यात आले आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबााबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.

मुंबई - मृत गँगस्टर इकबाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी (दि.१८) चौकशी करण्यात येणार आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबााबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरातील ईडीच्या कार्यालयात त्यांना पाचारण करण्यात आले आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असल्याने पटेल यांच्या चौकशीमुळे त्यांचे राजकीय पडसाद उमटू नये, त्याबाबत पुरेशी दक्षात घेण्यात आली असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून पुढे आली आहे. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे.अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरार असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसDawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई