शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : हवाला ऑपरेटर महिलेला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 17:59 IST

ईडीकडून याआधी अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरून हवालाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याची माहिती ईडीच्या चौकशीत रंजित बिंद्रा याने दिली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची यांची भागीदारी होती.

मुंबई - वरळी येथील इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अलीकडेच चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडीकडून याआधी अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची यांची भागीदारी होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  वरळी येथील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबाबत ईडी सध्या चौकशी करत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खास हस्तक असेलेल्या मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये या दोन फ्लॅटचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायूं मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडीने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे.

रिंकू देशपांडे आणि तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्चीसोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा याला ४० कोटी रुपयांची दलाली मिळवून देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आलं असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. अटक आरोपी रणजित बिंद्राने ईडी चौकशीत ३ जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडनमध्ये भेटला होता अशी कबुली दिली आहे. यासाठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याची माहिती ईडीच्या चौकशीत रंजित बिंद्रा याने दिली आहे. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई