INX Media case: CBI is to interrogate Indrani Mukherjee in jail today | आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार 
आयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार 

ठळक मुद्दे सीबीआय आज भायखळा कारागृहात शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार आहे. मुंबईतील विशेष कोर्टात इंद्राणीची चौकशी करण्यासाठी अर्ज सीबीआयने दाखल केला होता.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशाचे माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली होती. या अनुषंगाने सीबीआय आज भायखळा कारागृहात शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीची चौकशी करणार आहे. मुंबईतील विशेष कोर्टात इंद्राणीची चौकशी करण्यासाठी अर्ज सीबीआयने दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने सीबीआयची मागणी मान्य करत सीबीआयला भायखळा कारागृहात चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. 

इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडियाची माजी प्रमुख असून गेल्या वर्षी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्तीविरोधात तिने दिल्ली कोर्टात कबुली जबाब दिला होता. सध्या पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणी तिहार कारागृहात १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. ते या प्रकरणी मुख्य आरोपी असून त्यांना सीबीआयकडून नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. 

English summary :
INX Media Case: Former Finance Minister of the country P Chidambaram got arrested by CBI in the case of INX Media. CBI had filed an application to inquire Indrani Mukherjee in a special court in Mumbai.


Web Title: INX Media case: CBI is to interrogate Indrani Mukherjee in jail today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.