नोकरीचं आमिष दाखवून भेटायला बोलावलं, शारीरिक संबंध प्रस्थापित केले अन्...; तरुणीसोबत भयंकर घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:08 IST2024-02-06T14:07:22+5:302024-02-06T14:08:21+5:30
ज्या तरुणीवर हल्ला करण्यात आला ती मूळची सिक्कीम येथील रहिवासी असल्याचे समजते.

नोकरीचं आमिष दाखवून भेटायला बोलावलं, शारीरिक संबंध प्रस्थापित केले अन्...; तरुणीसोबत भयंकर घटना
नवी दिल्ली : एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी हे दिल्लीत सोबत राहत होते, अशी माहिती आहे. ज्या तरुणीवर हल्ला करण्यात आला ती मूळची सिक्कीम येथील रहिवासी असल्याचे समजते. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पारस असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पारस आणि पीडित तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर पारसने पीडित तरुणीला नोकरी देण्याचं आमिष दाखवून दिल्लीला बोलावलं. मागील काही दिवसांपासून ते दोघेही एकत्रच राहत होते. यादरम्यान पारसने पीडितेसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र ३० जानेवारी रोजी जेव्हा पीडितेने पारसकडे लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने थेट रॉडने हल्ला केला. तसंच गरम डाळही तिच्या अंगावर टाकली.
दरम्यान, आरोपी पारसने केलेल्या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी पारसला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.