आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 21:52 IST2020-10-27T21:51:31+5:302020-10-27T21:52:09+5:30
International Sex racket Busted : या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका
हरियाणा येथील पंचकुला जिल्ह्यात पोलिसांनीआंतरराष्ट्रीयसेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पंचकुलातील सेक्टर - १२ मध्ये हा गोरखधंदा सुरू होता. सेक्स रॅकेटमधील दलालांच्या तावडीतून पोलिसांनी ४ परदेशी तरुणींची सुटका केली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे.
४ परदेशी तरुणींच्या व्हिजाची देखील मुदत संपलेली आहे. पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. ज्यांनी या परदेशी तरुणींना देहविक्रीचा अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडलं अशा चार दलालांना पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. याच्याशी संबंधित प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.