शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मॅचफिक्सिंगप्रकरणी मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 9:08 AM

क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगच्या वादळाने खळबळ उडवली आहे.

बंगळुरू - क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगच्या वादळाने खळबळ उडवली आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगप्रकरणी काही क्रिकेटपटूना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या सेंट्रल क्राइम ब्रँचने अजून एक मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक प्रीमियर लीगमधील मॅचफिक्सिंग प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक करण्यात आली आहे. सय्यम असे या आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाचे नाव आहे. तो हरयाणातील राहणारा आहे. सट्टेबाजीच्या आरोपांमुळे त्याच्याविरोधात लूक-आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर निशांत सिंह शेखावत याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली होती.   भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचे समोर आले होते. बंगळुरू ब्लास्टर्स टीमचे बॉलिंग प्रशिक्षक विनू प्रसाद आणि बॅटिंग प्रशिक्षक विश्वनाथन यांना मागच्या वर्षी बंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्समध्ये झालेल्या मॅचमध्ये फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केला होती.सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 च्या मोसमात सहभागी होता. तसेच त्याला  मुंबई आणि दिल्ली संघाने देखील आपल्या संघात घेतले होते.

टॅग्स :match fixingमॅच फिक्सिंगCrime Newsगुन्हेगारी