विद्यार्थिनीवर चार वर्षे केला लैंगिक अत्याचार; प्रशिक्षक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:24 IST2021-08-07T10:17:41+5:302021-08-07T10:24:03+5:30

Crime News : २२ वर्षीय तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर तब्बल चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उजेडात आला.

instructor arested for sexually abuses student | विद्यार्थिनीवर चार वर्षे केला लैंगिक अत्याचार; प्रशिक्षक गजाआड

विद्यार्थिनीवर चार वर्षे केला लैंगिक अत्याचार; प्रशिक्षक गजाआड

अकाेला : वसंत देसाई स्टेडियमवर सराव करणाऱ्या विद्यार्थिनींना पाेलीस भरती, सैनिक भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकाने त्याची विद्यार्थिनी असलेल्या २२ वर्षीय तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर तब्बल चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उजेडात आला. या प्रकरणात रामदास पेठ पाेलिसांनी आराेपीला अटक केली असून, त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

मूळची शेगाव येथील रहिवासी असलेली २२ वर्षीय तरूणी सध्या अकाेल्यात भाड्याने राहते. या तरुणीने पाेलीस भरती व सैनिक भरतीचे प्रशिक्षक असलेला हरिहर पेठ येथील रहिवासी अमित जाधव याच्याकडे चार वर्षांपूर्वी प्रशिक्षण घेण्यासाठी प्रारंभ केला. दाेघेही एनसीसी या ठिकाणी असल्याने त्यांच्यात ओळख आणखी वाढली. अशातच प्रशिक्षक अमित जाधव याने तरुणीला प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध ठिकाणी एकटीला बाेलावून तिच्यावर प्रेम करीत असल्याची बतावणी केली. तरुणीही प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर या प्रशिक्षकाने गत चार वर्षांपासून विविध ठिकाणी नेत तिचे लैंगिक शाेषण केले. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणाची तक्रार गुरुवारी रात्री रामदास पेठ पाेलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी तिची तातडीने वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. रामदास पेठ पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपी प्रशिक्षक अमित जाधव यास अटक केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

 

पाच दिवसांची पाेलीस काेठडी

आराेपी प्रशिक्षक अमित जाधव याला अटक केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी न्यायालयासमाेर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. आराेपी प्रशिक्षक याने आणखी काहींचा छळ केला का, याचाही तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: instructor arested for sexually abuses student