ईअर बड्स ऐवजी निघाले अडीच कोटींचे आयपॉड्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 08:58 IST2022-12-03T08:57:51+5:302022-12-03T08:58:21+5:30
सीमा शुल्क विभागाकडून ऐवज जप्त

ईअर बड्स ऐवजी निघाले अडीच कोटींचे आयपॉड्स
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : येथील जेएनपीटी बंदरातील तस्करी थांबायचे नाव घेत नसून सीमा शुल्क विभागाने गुरुवारी ऑटाेमोबाइल पार्ट्स आणि ईअर बड्सच्या नावाखाली अडीच कोटी रुपये किमतीच्या एअरपॉड्स, एलईडी लॅम्पची तस्करी उघड केली आहे. हा सर्व मुद्देमाल सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सील केला आहे.
बुधवारी सीमा शुल्क विभागाने एका कंटेनरमधून झाडू, ब्रश आणण्याच्या नावाखाली ई-सिगारेट्स, ई-सिगारेट्सच्या रीफिल, खेळण्यांसह ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने अशी तीन कोटींची तस्करी उघड केली होती. एका ४० फुटी कंटेनरमधून हा माल आणला होता. त्यात ऑटोमोबाइल पार्ट्स, स्टेशनरी आणि ईअर बड्स असल्याचे सांगण्यात आले होते.