निर्दयीपणा ! सतत रडते म्हणून आईने १६ दिवसांच्या चिमुकलीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:38 IST2019-03-25T19:34:16+5:302019-03-25T19:38:21+5:30
या प्रकरणी समा नदीम अन्सारी (२५) या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

निर्दयीपणा ! सतत रडते म्हणून आईने १६ दिवसांच्या चिमुकलीची केली हत्या
मुंबई - सतत रडणाऱ्या मुलीच्या आवाजाने कंटाळून एका आईने चक्क आपल्या १६ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी समा नदीम अन्सारी (२५) या महिलेस पोलिसांनीअटक केली आहे. रागातून हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.
सायनच्या मदिना मस्जिदजवळ समा आणि नदीम हे दाम्पत्य राहत. नदीम हा फर्निचर बनवण्याचे काम करतो. दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. नुकताच समाने एका मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे घरचे वातावरण आनंदी होते. गेल्या गुरुवारी १६ दिवसांची मुलगी वारंवार रडत असल्याने समाचा पारा चांगलाच चढला होता. त्यावेळी राग अनावर झालेल्या समाने कंटाळून मुलीला घरामागील नाल्यात फेकून तिची हत्या केली. काही वेळाने आपण केलेली चूक तिच्या लक्षात आल्यानंतर समाने मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. सर्वत्र शोधाशोध सुरु असताना मुलगी घरामागील नाल्यात सापडली. स्थानिकांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्या १६ दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नदीमने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केला. त्यानंतर पोलीस तपासात मुलीला झोपवून शौचालयासाठी आपण खाली आल्याची माहिती समाने पोलिसांना दिली. समा देत असलेल्या माहितीत संशय पोलिसांना आला. पोलिसांनी समाला फिरवून प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर एका क्षणाला समाचा बांध फुटला. त्यावेळी रडत रडत तिने मुलीच्या हत्येची कबूली दिली. रागातूनच हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.