नागपुरात तरुणीवर अमानुष अत्याचार :निर्भयाकांडाची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:28 IST2020-01-28T00:26:40+5:302020-01-28T00:28:40+5:30

स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानंतर एका तरुणीवर (वय १९) एका नराधमाने अत्याचार केला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Inhuman raped on young girl in Nagpur: Repetition of Nirbhaya case | नागपुरात तरुणीवर अमानुष अत्याचार :निर्भयाकांडाची पुनरावृत्ती

नागपुरात तरुणीवर अमानुष अत्याचार :निर्भयाकांडाची पुनरावृत्ती

ठळक मुद्देपारडीतील क्रौर्य, नराधम गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानंतर एका तरुणीवर (वय १९) एका नराधमाने अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून तरुणीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगिलाल रहांगडाले (वय ५२) नामक नराधमाला अटक केली.
पीडित तरुणी व तिचा भाऊ पारडीतील एका संस्थेत काम करतात. याच संस्थेत रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. संस्थेलगतच असलेल्या एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ, अन्य एक तरुणी तसेच रहांगडाले राहतो. २१ जानेवारीला तरुणीचा भाऊ गावाला गेला, सोबतची एक तरुणीही बाहेरगावी गेली. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर पहाटे ५ वाजतापर्यंत त्याने तरुणीवर अत्याचार केला. विकृत रहांगडालेने अत्याचार केल्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. ती अर्धमेल्या अवस्थेत असताना तो पसार झाला. सकाळी तरुणी शुद्धीवर आली. तिने बाजूला राहणाऱ्यांना ही माहिती दिली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकरण पारडी पोलिसांत गेले. तरुणीची थरारकथा ऐकून पोलिसांच्या अंगावरही काटा उभा राहिला. पोलिसांनी अत्याचाराचासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रहांगडाले याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याची २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली.

निर्भयाकांडाचा थरार
या घटनेने दिल्लीच्या निर्भयाकांडाचा थरार ताजा झाला आहे. देशभरात निर्भयाच्या आरोपींना तातडीने फासावर टांगण्याची मागणी होत असताना हा प्रकार घडल्याने पारडी परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Inhuman raped on young girl in Nagpur: Repetition of Nirbhaya case