शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

बंद फॅक्टरीतून ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 18:46 IST

रांजणगाव येथील बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करून मुंबई मार्गे देशभरात पुरविले जात असल्याचे समोर

ठळक मुद्देड्रग्ज विक्रीतून आलेले ८५ लाखांची रोकड जप्त या प्रकरणात पुन्हा मुंबई कनेक्शन उघडकीस

पिंपरी : अमली पदार्थांची निर्मिती कुठे आणि कशी होते, याचा तपास करीत असताना पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत. रांजणगाव येथील बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करून मुंबई मार्गे देशभरात ते पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेला आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये तुषार सूर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद कंपनीत सुमारे १३२ किलो एमडी ड्रग्ज बनवले होते. त्यातील ११२ किलो ड्रग्ज तुषार काळे याने नायगाव वसई येथील झुबी उडोको नावाच्या नायजेरियन आरोपीला विकले होते. राहिलेले २० किलो ड्रग्ज विक्रीसाठी जाताना अक्षय काळे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन अटक केली.

किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत संचालक आहे. त्याने अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंद गिरी गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी ड्रग्जसाठी उपलब्ध करून दिली. एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी ६० हजार रुपये दर ठरवला. तुषार काळे याने त्या बदल्यात ६७ लाख रुपये दिले. मोठा आर्थिक व्यवहार झाल्याने पोलिसांनी आरोपींची बँक खाती फ्रीज केली आहेत. तुषार काळे याला राकेश खानिवडेकर याने ड्रग्ज बनवणे, विकणे आणि पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. राकेश याला यापूर्वी डीआरआयच्या अधिका-यांनी पालघर येथील कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून घेतली दोन एकर शेतजमीनड्रग्ज विक्रीतून आलेले ८५ लाखांची रोकड तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्याकडून जप्त केली आहे. तुषार काळे याने स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी पालसाई, ता. वाडा, जि. पालघर येथे ७५ लाखांची दोन एकर शेतजमीन घेतली असून ती मालमत्ता ताब्यात घेण्यात येणार आहे. तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० कोटी ९० लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्तArrestअटक