15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 12:04 PM2021-09-06T12:04:23+5:302021-09-06T12:06:19+5:30

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोट सापडली नाही, पण जे मोबाईल नंबर सापडले आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे.

indore girl committed suicide due to online gaming | 15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली

15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली

Next

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मुलीने 'पबजी' गेमच्या नादात आपला जीव गमवला. तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ती ऑनलाइन गेम खेळत असे, तिला कंपनीकडून फोन येत होते, त्यामुळे तणावात होती. मात्र, याबाबत पोलीसांनी अद्यात कोणतीही प्रतिक्रीया दिली नसून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

दरम्यान, 20 वर्षीय राधा उर्फ ​​रक्षाने शनिवारी रात्री इंदूरच्या हिरानगर पोलीस स्टेशन परिसरातील न्यू गौरी नगरमध्ये घरात गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी ती कॉम्प्युटर कोर्स शिकण्यासाठी गावातून शहरात गेली होती. ती तिच्या भावासोबत इंदूर शहरात राहत होती.

तिचा भाऊ संजय संध्याकाळी कामावरून घरी आला होता. राधाने त्याला किराणा सामान आणण्यासाठी दुकानात पाठवले. त्यानंतर अर्ध्या तासात संजय घरी परत आला, तेव्हा राधा खोलीत फास्यावर लटकलेली होती. तिला एमवाय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राधा टॅलीचा कॉम्प्युटर कोर्स करत होती. तसेच, राधा गावातच कॉलेजच्या फर्स्ट ईअरचा अभ्यास करत होती.

राधाला PUBG हा ऑनलाइन गेम खेळण्याची आवड होती. ती एक -दोन दिवस तणावाखाली होती, कंपन्यांचे व्हॉट्सअॅप कॉल तिच्या मोबाईलवरही आले आहेत, अशी माहिती तिचा भाऊ संजय याने पोलिसांना दिली आहे. संजय म्हणाला की, ती नेहमी फोन ऑपरेट करायची, गेम सुद्धा खेळायची, तिने स्वतःला फाशी दिली, मी फोन पोलिसांकडे दिला आहे.

दरम्यान, पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. राधाचे वडील गावातच मजूर म्हणून काम करतात. तर भाऊ संजय इंदूरमध्ये अॅल्युमिनियमचे काम करतो. राधाची आईही मजुरीचे काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोट सापडली नाही, पण जे मोबाईल नंबर सापडले आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे.

Web Title: indore girl committed suicide due to online gaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.