Indian Nurse 14 months Jailed in Singapore: सिंगापूरमधील रॅफल्स रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या एका भारतीय महिलेवर एका तरुणाचा विनयभंग केल्याचा आरोप होता. न्यायालयीन सुनावणीनंतर भारतीय नर्स दोषी आढळली. त्यामुळे न्यायालयाने भारतीय नर्स अलिप शिवा नागू हिला १४ महिन्यांची शिक्षा सुनावली आणि चाबकाच्या दोन फटक्यांचीही शिक्षा सुनावली.
नेमके प्रकरण काय?
पिडित व्यक्तीची उपसरकारी वकील युजीन फुआ यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडित नॉर्थ ब्रिज रोडवरील रुग्णालयात दाखल असलेल्या त्याच्या आजोबांना भेटण्यासाठी गेला होता. संध्याकाळी ७.३० वाजता पीडित रुग्णाच्या खोलीतील शौचालयात शिरला आणि तो शौचालय वापरत असताना अलिपने आत डोकावून पाहिले. शौचालयाचे सॅनिटायझेशन करण्याचा बहाणा करत नर्सने पीडित व्यक्तीच्या हातांना साबण लावला आणि त्यानंतर विनयभंग केला. घडलेल्या घटनेमुळे धक्का बसलेल्या पीडित व्यक्तीला खूप वेळ हालचाल करता आली नाही. या घटनेनंतर पीडित व्यक्ती पुन्हा आजोबांच्या पलंगावर आली आणि नंतर त्याने घटनेबाबत तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांनी नर्सला अटकही करण्यात आली.
महिलेने गुन्हा कबूल केला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी नर्सने न्यायालयात तिचा गुन्हा कबूल केला. पूर्ण सुनावणीनंतर न्यायालयाचा निकाल जाहीर करण्यात आला, तेव्हा तिला शिक्षा सुनावण्यात आली. पीडित व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सिंगापूरमधील रुग्णालयात एका तरुणाचा विनयभंग केल्याबद्दल भारतीय नर्स अलिप शिवा नागू हिला एक वर्ष आणि दोन महिने तुरुंगवासाची आणि दोन फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने परिसर निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नर्सला लगेचच कामावर काढून टाकण्यात आले.
Web Summary : An Indian nurse in Singapore was jailed 14 months and caned for molesting a patient's relative. She abused sanitization excuses. She was fired after the incident.
Web Summary : सिंगापुर में एक भारतीय नर्स को मरीज के रिश्तेदार से छेड़छाड़ के आरोप में 14 महीने की जेल और बेंत से पीटने की सजा मिली। उसने सैनिटाइजेशन का बहाना बनाया। घटना के बाद उसे निकाल दिया गया।