इंडियन नेव्हीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 02:02 IST2020-09-16T01:49:12+5:302020-09-16T02:02:32+5:30
इंडियन नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात मोबाइल, लॅपटॉप तसेच सोने मिळवून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे प्राप्त झाली होती.

इंडियन नेव्हीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक
नवी मुंबई : नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात वस्तू मिळवून देतो सांगून पैसे उकळून फसवणूक करणाºयाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो स्वत:ला इंडियन नेव्हीचा आॅफिसर असल्याचे सांगून ही फसवणूक करायचा. कारवाईनंतर त्याच्याकडून वेगवेळ्या प्रकारची बनावट प्रमाणपत्रे व बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
इंडियन नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात मोबाइल, लॅपटॉप तसेच सोने मिळवून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे प्राप्त झाली होती. या तोतया नेव्ही अधिकाºयाने तक्रादाराला ७ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्याद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक राजेश महाल यांचे पथक तयार केले होते.
अखेर १० सप्टेंबरला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो मुंबईत मेट्रो सिनेमा लगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचला असता तो पोलिसांच्या हाती लागला. मनीष अरिसेला (२४) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.