Pragya Singh Thakur : खासदाराला मुलीचा न्यूड व्हिडीओ कॉल, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:43 IST2022-02-07T14:36:51+5:302022-02-07T14:43:01+5:30
Pragya Singh Thakur : रविवारी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल नंबरवरून फोटो आणि मेसेज आले. यावर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टीटी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Pragya Singh Thakur : खासदाराला मुलीचा न्यूड व्हिडीओ कॉल, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
नवी दिल्ली : खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी रात्री एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये ती मुलगी नग्न अवस्थेत दिसली. यानंतर रविवारी सायंकाळी दोन अनोळखी क्रमांकावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात फोन नंबरवर एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
रविवारी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल नंबरवरून फोटो आणि मेसेज आले. यावर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टीटी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दोन मोबाईल नंबरवरून आलेल्या आक्षेपार्ह मेसेजवरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. टीटी नगर टीआय चेन सिंग रघुवंशी यांनी सांगितले की, अज्ञात फोन नंबर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना यापूर्वीही अश्लील फोटो पाठवण्यात आले होते. मोबाईल नंबर्सचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 5 फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ती दोन दिवस घरी आराम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी संध्याकाळी 7 वाजता एका तरुणीचा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला, काही वेळाने मुलीने कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच खासदारांनी फोन कट केला. हा व्हिडिओ कॉल मोबाईल क्रमांक 6371 608 664 वरून आला होता. यानंतर काही वेळातच खासदार आणि त्या मुलीचा रेकॉर्डिंग व्हिडिओ दुसऱ्या क्रमांक 82807 74239 वरून पाठवण्यात आला.
यासोबतच आरोपीने मागणी मान्य न केल्यास प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तत्कालीन टीटी नगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. खासदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 354, 507 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.