तरुणीसोबत अश्लील चॅट; भाजप आमदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:32 IST2024-08-20T11:32:34+5:302024-08-20T11:32:43+5:30

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

Indecent chat with young lady; Case registered against BJP MLA | तरुणीसोबत अश्लील चॅट; भाजप आमदारावर गुन्हा दाखल

तरुणीसोबत अश्लील चॅट; भाजप आमदारावर गुन्हा दाखल

- बलवंत तक्षक

चंडीगड : तरुणीसोबत अश्लील चॅटिंग केल्याच्या प्रकरणात हिमाचलमधील भाजप आमदार हंसराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

तक्रारीत मुलीने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी कलम १६४ अन्वये न्यायालयात जबाबही नोंदवले आहेत. याप्रकरणी भाजप आमदारावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. सामाजिक संस्थांनीही कारवाईसाठी आवाज उठविला आहे.

पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी सांगितले की, तरुणीने आमदाराविरुद्ध अश्लील चॅटिंगची तक्रार दाखल केली आहे, तर आमदार हंसराज यांनी म्हटले की, आपल्याला बदनाम करण्यासाठी काँग्रेस कारस्थान करत आहेत. 

Web Title: Indecent chat with young lady; Case registered against BJP MLA