शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाऊनमध्ये वाढल्या वाहनचोरीच्या घटना, कल्याण परिमंडळात चोरट्यांचा उच्छाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 01:39 IST

कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत घरफोडी, चोरी, हाणामारी, सोनसाखळीचोरी, दुचाकीचोरी, आॅनलाइनद्वारे फसवणूक यासारखे गुन्हे नेहमीच घडतात. मात्र, वाहनचोरी व आॅनलाइनद्वारे फसवणूकवगळता अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लॉकडाऊनच्या काळात कमालीची घट झाली होती. वाहनचोरीचे सत्र लॉकडाऊनप्रमाणे अनलॉकमध्येही सर्रास सुरू आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग व अथवा मानपाडा पोलीस यांनी दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींना काही दिवसांपूर्वीच जेरबंद केले आहे.कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात २३ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. दरम्यान, मनपा क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सुरू असलेल्या अनलॉक-४ मध्येही ४४ कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम आहे.लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला लागू झालेली संचारबंदी पाहता त्यावेळेस इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. केवळ संचारबंदीचे उल्लंघन करण्यासंदर्भातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. याचबरोबर वाहनचोरीच्या घटनांचे सत्रही सुरूच होते. गेल्या सहा महिन्यांत ६८ वाहनांची चोरी झाली आहे. यात दुचाकी, रिक्षा आणि मोटारसारख्या वाहनांचाही समावेश आहे. यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके तैनात केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. परंतु, सध्या अनलॉकमध्येही वाहनचोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे.दुचाकींसह रिक्षा आणि कार चोरीलाकल्याण परिमंडळ-३ अंतर्गत येणाºया महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९, बाजारपेठच्या परिक्षेत्रात ११, खडकपाडा हद्दीत ६, तर डोंबिवलीतील रामनगरमध्ये ८, विष्णूनगरमध्ये २, टिळकनगर क्षेत्रात ६, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वाहने चोरीला गेली आहेत. चोरीस गेलेल्या वाहनांमध्ये ५४ दुचाकी, आठ रिक्षा व सहा मोटारींचा समावेश आहे.... तरीही प्रकार सुरूचकल्याण : एकीकडे दुचाकीचोरीचे गुन्हे वाढले असताना दुसरीकडे हैदर अक्रम इराणी या दुचाकीचोराला कल्याणच्या अ‍ॅण्टीरॉबरी सेलने अटक केली. तरीही शहरांमध्ये वाहनचारीच्या घटना सुरूच आहेत.पोलिसांनी हैदरकडून चार लाख १५ हजार रुपये किमतीच्या आठ महागड्या दुचाकी आणि एक मोबाइल हस्तगत केला आहे. तर, त्याच्या चौकशीत एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. हैदर हा सराईत चेनस्नॅचरही असून, त्याच्यावर नाशिक, पुणे, ठाणे येथे १४ जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. तसेच त्याच्याविरोधात शांतीनगर, खडकपाडा, उल्हासनगर, कोळसेवाडी, कल्याण तालुका (टिटवाळा) सह मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यात बाइकचोरीचे गुन्हे दाखल आहेत.डोंबिवली येथील मानपाडा पोलिसांनीही दुचाकी चोरणाºया तिघा अल्पवयीन चोरट्यांना पकडले. या तिघांकडून आठ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सात महागड्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मात्र, ते अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. विशेष म्हणजे, यू-ट्युबवर दुचाकीचोरीचे प्रशिक्षण घेऊन या चोरट्यांनी एक्सो ब्लेड, कटर, फ्यूज, आदी सामान खरेदी केले. चोरलेल्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून फिरणे, मौजमजा करणे, दुचाक्या कमी किमतीत विकण्यासाठी ग्राहकांचा शोध घेणे, असा या चोरट्यांचा नित्यक्रम होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkalyanकल्याण