बनावट नोटा तस्कराच्या पोलीस कोठडीत वाढ, व्हॉइस सॅम्पल ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:23 PM2020-02-13T22:23:22+5:302020-02-13T22:23:39+5:30

दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतीय चलनाच्या बनावट नोटाची तस्करी करणाऱ्या जावेद गुलामनबी शेख (वय ३५, रा. कळवा) याची पोलीस कोठडी १८ फेबु्रवारीपर्यत वाढविण्यात आली आहे.

Increase in police custody of fake nota smugglers | बनावट नोटा तस्कराच्या पोलीस कोठडीत वाढ, व्हॉइस सॅम्पल ताब्यात  

बनावट नोटा तस्कराच्या पोलीस कोठडीत वाढ, व्हॉइस सॅम्पल ताब्यात  

googlenewsNext

मुंबई : दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतीय चलनाच्या बनावट नोटाची तस्करी करणाऱ्या जावेद गुलामनबी शेख (वय ३५, रा. कळवा) याची पोलीस कोठडी १८ फेबु्रवारीपर्यत वाढविण्यात आली आहे. बनावट नोटा आयात करण्याच्या अनुषंगाने त्याच्या मोबाईलमधील संभाषण पोलिसांनी मिळविले असून त्यातून या प्रकरणातील अन्य सूत्रधारांचा माग काढता येणार आहे.

आठ फेबु्रवारीला गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-८ च्या पथकाने आठ फेबु्रवारीला जावेद शेख याला अटक करुन २ हजार रुपये चलनाच्या ११९३ नोटा जप्त केल्या आहेत. तो दुबईहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडील बनावट नोटांची भारतीय चलनातील किंमत ऐकून २३ लाख ८० हजार इतकी होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्याच्या मोबाईल संभाषणाची क्लिप मिळाली असून त्याच्या सहाय्याने बनावट नोटाची तस्करीतील अन्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Increase in police custody of fake nota smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.