शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कुबेराचा खजिना! 60 कोटींहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त, नोटांचे बंडल पाहून थक्क व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:48 IST

इनकम टॅक्स विभागाने तंबाखू बनवणाऱ्या कंपनीच्या ठिकाणांवर छापेमारी करुन कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत.

Income Tax:आयकर विभागाने (IT) कानपूरमधील एका तंबाखू कंपनीवर छापा टाकला आहे. या छाप्यात सापडलेल्या वस्तू पाहून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. तंबाखू उत्पादन करणारी कंपनी किती कमाई करू शकते, या विचारात तुम्ही पडाल. तर, आयकर विभागाने कानपूर येथील बंशीधर टोबॅको कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. कानपूरसह 5 राज्यांमध्ये 15 ते 20 पथकांनी ही कारवाई केली. 

60 कोटींची वाहने सापडली आहेतया छाप्यात आयकर विभागाला 60 कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान कार सापडल्या आहेत. या गाड्या त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आल्या होत्या. या कारमध्ये सर्वात महागडी कार रोल्स रॉयस फँटम होती, ज्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. बंशीधर तंबाखूचे मालक केके मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मॅक्लारेन, लॅम्बोर्गिनी, फेरारी या करोडो रुपयांच्या कारही सापडल्या. या छाप्यात आयकर विभागाने एकूण साडेचार कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे. याशिवाय काही कागदपत्रेही आयकर विभागाने जप्त केली आहेत.

कंपनीवर फसवणुकीचा आरोपआयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या लॉगमध्ये नोंदणीकृत कंपन्यांना बनावट धनादेश दिले जात होते. याशिवाय, कंपनी इतर अनेक मोठ्या पान मसाला घरांच्या उत्पादनांचा पुरवठा करत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपली उलाढाल 20-25 कोटी रुपये दाखवली, मात्र प्रत्यक्षात ही उलाढाल 100-150 कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. 

अधिकारी 6 वाहनांतून आले होतेमिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 80 वर्षांपासून तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या फर्मचे मालक केके मिश्रा उर्फ ​​मुन्ना मिश्रा यांचे नयागंज येथे जुने कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी 6 वाहनांत आले आणि त्यांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतले. कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली. सध्या रिअल इस्टेट, बेनामी मालमत्तांशिवाय रोख रकमेचाही शोध सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार,, आयकर विभागाच्या 15 ते 20 पथके गुजरातमधील अहमदाबाद, उत्तर प्रदेशातील कानपूर, आंध्र प्रदेश आणि दिल्ली येथे छापे टाकत आहेत.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश