शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत मानवजातीला ‘कलंक’; कामगाराला खायला लावली विष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 14:04 IST

वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली.

पिंपरी : वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. यामध्ये मालकाला राग अनावर झाल्याने त्याने कामगाराला चक्क विष्ठा खाण्यास भाग पाडले. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली.याप्रकरणी संदीप पवार नामक व्यक्तीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कामगाराने फिर्याद दिली आहे. मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कामगार व त्याचे कुटुंबीय पवार याच्या वीटभाट्टीवर कामाला असून तेथेच रहायला आहे.  बुधवारी दुपारी फिर्यादीचे कुटुंबीय वीटभट्टीजवळ असताना 'कामाला सुरुवात कर', असे पवार कामगाराला म्हणाला, त्यावेळी कामगार म्हणाला  'आताच जेवण केलंय थोडा वेळातच कामाला सुरुवात करतो'. दरम्यान कामगार असे म्हटल्याने मालकाला राग अनावर झाला. यावरून मालकाने त्याला शिव्या दिल्या. त्यानंतर कामगारनेही मालकाला शिव्या दिल्या. यामुळे संतापलेल्या पवार याने कामगाराला विष्ठा खा असे सांगत त्याच्या आई बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. मात्र, यावर कामगाराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मालकाने त्याला मारहाण केली.  यामुळे घाबरलेल्या कामगाराने विष्ठा खाल्ली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEmployeeकर्मचारीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस