शेतात अत्याचार करुन अश्लिल फोटो काढले अन् तिच्याच मुलीला पाठवले, अमरावतीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:05 IST2021-12-29T18:04:44+5:302021-12-29T18:05:01+5:30

तक्रारीनुसार ४० वर्षीय पीडितेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले.

An incident of threatening a woman by torturing her in a field has taken place in Amravati | शेतात अत्याचार करुन अश्लिल फोटो काढले अन् तिच्याच मुलीला पाठवले, अमरावतीमधील घटना

शेतात अत्याचार करुन अश्लिल फोटो काढले अन् तिच्याच मुलीला पाठवले, अमरावतीमधील घटना

अमरावती: एका महिलेशी केलेल्या शारीरिक बळजबरीदरम्यानच्या छायाचित्रांसह तिची न्यूड छायाचित्रे तिच्याच मुलीला पाठविल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आरोपी मो. सोहेल मो. शकील (२२, रा. काकडा, ता. अचलपूर) याच्याविरूद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार ४० वर्षीय पीडितेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. ती तिच्या दोन मुलांसह राहते. दरम्यान शेतीकामाच्या माध्यमातून तिची सहा महिन्यांपूर्वी आरोपीशी भेट झाली. ती अन्य मजूर महिलांना घेऊन मो. सोहेलच्या ऑटोने लगतच्या गावातील शेतात जात होती. त्यातून त्याने प्रेमसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला पीडितेने नकार दिला. 

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी पीडिता ही एका शेतात असताना त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिचे अश्लील छायाचित्र काढली. शरीरसंबंधाचे देखील छायाचित्रण केले. ते मुलीला व नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन त्याने पीडितेचे वारंवार शोषण केले.

त्याने गाठला निर्लज्जतेचा कळस-

आरोपीने तिला धमकी देऊन अनेकदा शोषण केले. मुलगी समजदार असल्याने तिने त्या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचे अश्लील व आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्याच मुलीच्या व अन्य नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकले. त्यामुळे पीडिताची सामाजिक बदनामी झाली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर पीडिताच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्याने ती छायाचित्रे त्यांना दाखविली. त्या बदनामी व त्रासाला कंटाळून अखेर तिने २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पथ्रोट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: An incident of threatening a woman by torturing her in a field has taken place in Amravati