धक्कादायक! जुन्या वादातून युवकाला संपवलं; ५-६ जणांनी चाकू भोसकून केली हत्या

By सुरेंद्र राऊत | Updated: June 6, 2025 23:17 IST2025-06-06T23:17:17+5:302025-06-06T23:17:38+5:30

दोन दिवसापूर्वी सुरतचा काही जणांशी वाद झाला होता. यातूनच त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

In Yavatmal, A young man was killed over an old dispute; 5-6 people stabbed him to death | धक्कादायक! जुन्या वादातून युवकाला संपवलं; ५-६ जणांनी चाकू भोसकून केली हत्या

धक्कादायक! जुन्या वादातून युवकाला संपवलं; ५-६ जणांनी चाकू भोसकून केली हत्या

सुरेंद्र राऊत

यवतमाळ:  शहरात मंगळवारपासून खूनाचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी रात्री 9.45 वाजता संकट मोचन परिसरात पाच ते सहा जणांनी चाकूने भोसकून युवकाची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

सुरज घटाळे (२१) असे  मृताचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सुरतचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दोन दिवसापूर्वी सुरतचा काही जणांशी वाद झाला होता. यातूनच त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: In Yavatmal, A young man was killed over an old dispute; 5-6 people stabbed him to death