शिकारी खुद शिकार हो गया! माजी आमदाराच्या घरी चोरी करून पळाला अन् वाटेतच कांड झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:39 IST2025-01-17T13:36:33+5:302025-01-17T13:39:47+5:30

रमनच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर काही तासांतच चोरांना पकडले.

In Uttar Pradesh, a thief stole 1 lakh from the house of a former MLA in Agra and fled. On the way, some thieves looted the thief himself. | शिकारी खुद शिकार हो गया! माजी आमदाराच्या घरी चोरी करून पळाला अन् वाटेतच कांड झाला

शिकारी खुद शिकार हो गया! माजी आमदाराच्या घरी चोरी करून पळाला अन् वाटेतच कांड झाला

आग्रा - उत्तर प्रदेशच्या आग्रा पोलीस स्टेशनमध्ये एक अजब प्रकरण उघडकीस आलं आहे. एका नेपाळी युवकाला माजी आमदारानं कामावर ठेवलं होते, मात्र या युवकाने त्यांच्या घरातूनच १ लाख रुपये चोरी करून पळाला. परंतु 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर' असं म्हणतात तसेच काही या युवकासोबत घडले. या युवकाचा पीडित म्हणून वृत्तपत्रात फोटो छापून आला तेव्हा माजी आमदाराने त्याला ओळखलं आणि त्यांनी पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी बहाण्याने त्याला बोलावले आणि तिथे माजी आमदारांना पाहून त्याला घाम फुटला. पोलिसांनी युवकाला अटक केली जो ठाण्यात तक्रारदार म्हणून आला होता.

माजी आमदार आझाद सिंह कर्दम यांच्या घरी रमन नावाचा नेपाळी युवक काम करत होता. २४ डिसेंबरला तो कामावर आला होता. १३ जानेवारीला एका कार्यक्रमावेळी आमदाराचं कुटुंब व्यस्त होते तेव्हा रमननं त्यांच्या घरातील कपाटाचं कुलूप तोडून त्यातून १ लाख रुपये चोरी करून फरार झाला. दुसऱ्या दिवशी त्याने महागडी दारू प्यायली आणि १५ हजार रुपयांचा फोन खरेदी केला. उरलेले पैसे घेऊन तो त्याच्या मित्रांना भेटायला अलीगडच्या दिशेने निघाला होता, तेव्हा वाटेतच काही टोळक्यांनी त्याला अडवून त्याच्याकडची रक्कम लुटली. 

रमनने याबाबत पोलीस ठाणे गाठून तिथे तक्रार नोंदवली. त्याने तक्रारीत म्हटलं की, मी वाटरव्रक्स चौकातून रामबागला जायला ऑटो पकडली होती. रामबागहून मला अलीगडसाठी बस होती. मी तिथे माझ्या मित्रांना भेटायला जात होतो परंतु ज्या ऑटोत मी बसलो होतो त्यात दरोडेखोर होते. त्यांनी निर्जनस्थळी ऑटो थांबवून मला लुटले. माझ्याकडे ७५ हजार रुपये होते ते हिसकावले आणि चालत्या ऑटोतून फेकले. त्यानंतर ११२ नंबरवर फोन करून मी संबंधित घटना पोलिसांना कळवली असं त्याने म्हटलं.

दरम्यान, रमनच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर काही तासांतच चोरांना पकडले. या चोरट्यांकडून २० हजार रुपये आणि ऑटो जप्त करण्यात आली. ही घटना काही पत्रकारांनी त्यांच्या वृत्तपत्रात छापली त्यात रमनचा पीडित म्हणून फोटो छापण्यात आला. हाच फोटो दुसऱ्या दिवशी माजी आमदार आझाद कर्दम यांनी पाहिला आणि त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक देवेंद्र दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्याच्या बहाण्याने रमनला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलवले तेव्हा माजी आमदारही तिथे पोहचले आणि या सर्व प्रकाराचा पर्दाफाश झाला.  

Web Title: In Uttar Pradesh, a thief stole 1 lakh from the house of a former MLA in Agra and fled. On the way, some thieves looted the thief himself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.