ईडी कार्यालयात मध्यरात्री पाेहाेचल्या ममतांच्या नातलग, कुलूप पाहून परतल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 06:02 IST2022-09-13T06:01:58+5:302022-09-13T06:02:18+5:30
ईडीने मेनका गंभीर यांना चाैकशीसाठी परदेशात जाणाऱ्या विमानात बसण्यापासून शनिवारी राेखले हाेते.

ईडी कार्यालयात मध्यरात्री पाेहाेचल्या ममतांच्या नातलग, कुलूप पाहून परतल्या
काेलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेव्हणी मेनका गंभीर यांना ईडीने चक्क मध्यरात्री साडेबारा वाजता चाैकशीसाठी हजर हाेण्याचे समन्स बजावले हाेते. त्या वकिलांसाेबत दिलेल्या वेळेवर कार्यालयाबाहेर पाेहाेचल्यादेखील. मात्र, कार्यालयाला कुलूप हाेते. ईडीतर्फे चुकीने मध्यरात्री साडेबारा वाजताचा उल्लेख नाेटिशीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईडीविराेधात उच्च न्यायालयात याचिका
ईडीने मेनका गंभीर यांना चाैकशीसाठी परदेशात जाणाऱ्या विमानात बसण्यापासून शनिवारी राेखले हाेते. न्यायलयाच्या आदेशात तशा सूचना नसल्याचे सांगून गंभीर यांनी ईडीविराेधात अवमानना याचिका दाखल केली आहे.