शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:04 IST2025-11-08T14:03:43+5:302025-11-08T14:04:38+5:30
या घटनेबाबत आरोपींविरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम १०३(१) हत्या आणि २३८ अंतर्गत पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AI Generated Image
ठाणे - बदलापूर येथील ४४ वर्षीय व्यक्तीची त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून गळा दाबून हत्या केली आहे. हत्येनंतर पतीचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. शनिवारी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपी मनीषा परमार आणि लक्ष्मण भोईर दोघेही शेजारी होते. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. ही बाब पती किशन परमार यांना कळली तेव्हा पत्नी मनीषाला त्यांनी जाब विचारला. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला.
याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, या दोन्ही आरोपींनी किशन परमार यांचा रस्सीने गळा दाबला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी मृतदेह एका चादरीत गुंडाळून बदलापूर येथे नदीत फेकून दिला आणि तिथून फरार झाले. गुरुवारी रात्री किशन यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला, जो पोस्टमोर्टमसाठी पाठवला होता. या घटनेबाबत आरोपींविरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम १०३(१) हत्या आणि २३८ अंतर्गत पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्याप यात कुठलाही सुगावा हाती लागला नाही.
शंका अन् पत्नीची हत्या
दुसरीकडे उत्तर प्रदेशात पीलीभीत इथे एका व्यक्तीने अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची दांडक्याने मारहाण करून हत्या केली आहे. माहितीनुसार, आरोपी राम बहादूर याने रागाच्या भरात पत्नी अनिताच्या डोक्यावर दांडक्याने वार केले. ज्यात ती गंभीररित्या जखमी झाली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अनिताला हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु रस्त्यातच तिने जीव सोडला. या प्रकरणात गुन्हा दाखल करत मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला. पोलीस फरार पतीचा शोध घेत असून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत.