सुरतच्या सरथाणा येथील 10 वर्षीय मुलीवर शुक्रवारी दुपारी झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मुलीचा पिता असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वास्तविक, पोलिसांच्या पथकाने पीडितेच्या घराजवळील एका दुकानात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, दुपारी वडील घरी आले होते. एवढेच नाही तर बलात्कारानंतर तो नराधम स्वतः मुलीला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी पित्याला अटक केली आहे. पकडल्यानंतर तो ढसाढसा रडू लागला आणि पोलिसांचे पाय धरत म्हणाला- साहेब! मोठी चूक झाली आहे.पोलिसांनी सांगितले की, मूळ नेपाळचे रहिवासी असलेले हे कुटुंब कामरेज रोडवरील सरथाणा येथे भाड्याच्या घरात राहते. कुटुंबात पती-पत्नीशिवाय 10 वर्षांचा, 7 वर्षांच्या दोन मुली आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. नवरा रोजंदारीवर तर पत्नी गिरणीत काम करतो. गुरुवारी पत्नी गिरणीत कामाला गेली होती. आरोपीने दोन्ही मुलांना दुसऱ्या खोलीत बंद करून त्यांची 10 वर्षीय मुलगी रिटा (नाव बदलले आहे) हिच्यावर बलात्कार करून तिला रक्तबंबाळ केले. यानंतर धाकट्या मुलीला तुझ्या बहीण लागल्याने रक्त आल्याची खोटी कथा सांगितली. हा प्रकार तिनेलहान मुलीने आजीला सांगितला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकही आले. यानंतर रिटाला स्मायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
साहेब! मोठी चूक झाली,१० वर्षांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार अन् स्वतःच घेऊन गेला क्लिनिकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 21:42 IST