बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:03 IST2025-08-07T14:02:43+5:302025-08-07T14:03:48+5:30
५ जुलै २०२४ रोजी सोनियाने तिच्या बहिणीच्या दीराला पतीला मारण्यासाठी ५० हजार ऑफर केले होते. त्याच रात्री सोनिया टेरेसवर झोपली होती तेव्हा आरोपी विजयने प्रीतमची हत्या केली.

बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
नवी दिल्ली - विवाहबाह्य संबंधांमुळे अलीकडच्या काळात हत्येसारखे दुर्दैवी प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहेत. दिल्लीत सोनिया नावाच्या महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. परंतु १ वर्ष पतीच्या हत्येबाबत कुणालाही कळले नाही मात्र दोघांकडून झालेल्या एका चुकीने त्यांचे रहस्य सर्वांसमोर उघड झाले. हरियाणातील सोनीपत इथलं हे प्रकरण आहे. याठिकाणी पतीच्या हत्येसाठी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, सोनीपतमध्ये महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला कायमचे संपवलं. हे प्रकरण १ वर्षांनी उघड झाले. मृत पतीचा फोन दोघांनी एक वर्षांनी ऑन केला तेव्हा सर्व कांड समोर आले. या घटनेत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडून कोर्टासमोर हजर केले. तिथे २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. १० जुलै २०२४ मध्ये हे हत्याकांड घडले. एका व्यक्तीचा अगवानपूर गावातील नाल्याजवळ बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचे हाय-पाय बांधले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस तिथे पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत सरकारी रुग्णालयातील शवागृहात ठेवले.
पत्नीचे प्रियकरासोबत संबंध...
या तपासात मृत व्यक्ती दिल्लीतील दयाल मार्केट इथे राहणारे प्रीतम प्रकाश असल्याची ओळख पटली. आता या प्रकरणात १ वर्षांनी पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. पोलिसांनी या ब्लाईंड मर्डरचा खुलासा करत पत्नी सोनिया आणि तिचा प्रियकर रोहित याला अटक केली. रोहित आणि सोनिया या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती प्रीतम प्रकाशसोबत पत्नीचे कायम वाद होत असे. एकेदिवशी सोनियाने पती प्रीतम प्रकाशला गनौर येथे भेटायला बोलावले आणि त्याची हत्या केली. परंतु पतीचा फोन सोनियाने प्रियकर रोहितला दिला होता. पोलिसांना या फोनचे लोकेशन कळल्यानंतर काही संशय निर्माण झाला. प्रीतमचा मोबाईल नंबर ट्रॅक केला जात होता. तो एक वर्षांनी पुन्हा ऑन करण्यात आला होता. त्या फोनच्या लोकेशनवरून पोलीस रोहितपर्यंत पोहचले.
#WATCH | Delhi | Crime Branch arrested Soniya, 34 years, resident of Alipur, Delhi, with her boyfriend Rohit, for conspiring to murder and dumping the body of her husband, Pritam Prakash, one year after the case was registered in PS Gannaur, Sonipat, Haryana.
— ANI (@ANI) August 2, 2025
(Source: Delhi… pic.twitter.com/IGpBRNJwq0
५० हजारात दिली हत्येची सुपारी
५ जुलै २०२४ रोजी सोनियाने तिच्या बहिणीच्या दीराला पतीला मारण्यासाठी ५० हजार ऑफर केले होते. त्याच रात्री सोनिया टेरेसवर झोपली होती तेव्हा आरोपी विजयने प्रीतमची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह अगवानपूर इथल्या नाल्याजवळ फेकला. आरोपी विजयने पुरावे मिटवण्यासाठी मृतदेहाचा व्हिडिओ सोनियाला पाठवला. जो नंतर सोनियाने डिलिट केला. हत्येनंतर सोनियाने पतीची रिक्षा साडे चार लाखात विकली आणि त्याचा मोबाईल रोहितला दिला होता. पतीच्या हत्येनंतर सोनिया प्रियकर रोहितसोबत राहू लागली. प्रीतमची हत्या करण्यात रोहितनेही विजयला मदत केली.
दरम्यान, सोनिया आणि प्रीतम यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली होती. त्यांना ३ मुले होती. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रोहितसोबत सोनियाचे प्रेमसंबंध जुळले. रोहितवर याआधी हत्या आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल आहेत. रोहितने एप्रिल २०२५ मध्ये लग्न केले होते परंतु सोनियासोबत त्याचे संबंध सुरूच होते. सध्या या प्रकरणात फरार आरोपी विजयचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.