मुस्लीम पाच्छा पेठेत दंगा करुन जमावानं फोडल्या कारच्या काचा, दहाजणांविरुद्ध गुन्हा 

By विलास जळकोटकर | Updated: February 19, 2024 18:16 IST2024-02-19T18:16:20+5:302024-02-19T18:16:27+5:30

जेलरोड पोलीस ठाण्यात दहाजणांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्हा नोंदला आहे.

In Solapur's Muslim Pacha Peth, a mob broke the glass of a car, a case was registered against 10 people. | मुस्लीम पाच्छा पेठेत दंगा करुन जमावानं फोडल्या कारच्या काचा, दहाजणांविरुद्ध गुन्हा 

मुस्लीम पाच्छा पेठेत दंगा करुन जमावानं फोडल्या कारच्या काचा, दहाजणांविरुद्ध गुन्हा 

सोलापूर : पाच ते सहा मोटारसायकलवरुन आठ ते दहा जणांचा जमाव आला आणि त्यांनी कारच्या पुढच्या-मागच्या काचा फोडून नुकसान करुन गेल्याची फिर्याद बिल्डर मुजमील इक्बाल जमादार (वय- ३७, रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी पोलिसात दिली. रविवारच्या रात्री १० ते मध्यरात्री १ या दरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले आहे. जेलरोड पोलीस ठाण्यात दहाजणांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, यातील फिर्यादी यांचा बिल्डरचा व्यवसाय आहे. मुस्लीम पाच्छा पेठेतील पीस टाॅवर मध्ये राहतात. त्यांच्या अपार्टमेंटसमोरील विठ्ठल मंदिराच्या सार्वजनिक रोडवर पाच ते सहा मोटारसायकलीवर आठ ते दहा जणांचा जमाव दंगा करण्याच्या हेतूने आला. त्यांनी फिर्यादीच्या कारच्या पुढच्या व मागच्या काचावर दगड मारुन फोडल्या.

यात कारचे आठ ते दहा हजार रुपयांचे नुकसान करुन जमाव निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी खबर मिळताच घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास सपोनि सोनवणे करीत आहेत.

Web Title: In Solapur's Muslim Pacha Peth, a mob broke the glass of a car, a case was registered against 10 people.