धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 08:55 IST2024-11-29T08:54:18+5:302024-11-29T08:55:00+5:30

भटक्या श्वानामुळे घटना समोर, हत्येनंतर २४ नोव्हेंबर रोजी  जोरदाग गावाजवळ एक भटका कुत्रा मानवी शरीराच्या बाजूला दिसल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

In Ranchi, a 25-year-old man strangled his 24-year-old 'live-in partner' to death and cut her body into several pieces | धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले

धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले

रांची : झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील जंगलाला लागून असलेल्या भागात कसाई म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या २४ वर्षीय  ‘लिव्ह-इन पार्टनर’ चा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे केल्याचे समोर आले आहे. नरेश भेंगरा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हत्येनंतर २४ नोव्हेंबर रोजी  जोरदाग गावाजवळ एक भटका कुत्रा मानवी शरीराच्या बाजूला दिसल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्याने महिलेच्या शरीराचे ४० ते ५० तुकडे केल्याचे कबूल केले आणि नंतर ते वन्य प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात टाकले होते.

अगोदर बलात्कार अन् नंतर गळा दाबला

महिलेला त्याच्या लग्नाची माहिती नसल्याने तिने त्याच्या घरी जाण्यासाठी दबाव टाकला. मात्र आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर स्कार्फने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि तो पत्नीसोबत राहण्यासाठी घरी गेला. मृत महिलेच्या सामानाची बॅग मिळाल्यानंतर महिलेची ओळख पटली.

Web Title: In Ranchi, a 25-year-old man strangled his 24-year-old 'live-in partner' to death and cut her body into several pieces