रडण्याचा राग आला, मुलीचे डोके भिंतीवर आपटून हत्या; मृतदेह छातीला लावून नेत दिले फेकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 08:11 IST2023-01-12T07:47:26+5:302023-01-12T08:11:16+5:30
आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला.

रडण्याचा राग आला, मुलीचे डोके भिंतीवर आपटून हत्या; मृतदेह छातीला लावून नेत दिले फेकून
राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या रडण्याचा राग आल्याने सावत्र बापाने तिची हत्या केली. यानंतर स्वत:च मृतदेह छातीला लावून नेत झुडपात फेकून दिला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तो मुलीचा मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे.
आरोपीने आधी मुलीचे डोके भिंतीवर आपटले, नंतर तिचा गळा आवळून खून केला. आपल्या मुलीचा मृतदेह फेकून देत तो घरी परतला. यानंतर त्याने पत्नीला मुलगी बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी तयार करून सांगितली आणि पत्नीसह तिचा शोध घेण्यात मग्न झाला.
नेमके काय झाले?
अनन्या ही सावत्र मुलगी असल्याचे आरोपी अमित गोर याने सांगितले. शुक्रवारी दुपारी ती आईकडे जाण्याचा हट्ट करत होती. अमितने नकार देताच ती रडू लागली. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती हट्ट धरून बसल्याने त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. यावेळी मुलीची आई कारखान्यात कामाला गेली होती.