धक्कादायक! झोपेतच पत्नीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; पोलिसांसमोर दिली हत्येची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 09:31 IST2022-12-13T09:31:21+5:302022-12-13T09:31:50+5:30

पोलिसांनी माहितीची खातरजमा करत आरोपी पती अशोकला ताब्यात घेतलं

In Rajasthan, Attacked wife with an ax in her sleep; Husband confessed to the murder before the police | धक्कादायक! झोपेतच पत्नीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; पोलिसांसमोर दिली हत्येची कबुली

धक्कादायक! झोपेतच पत्नीवर केला कुऱ्हाडीने हल्ला; पोलिसांसमोर दिली हत्येची कबुली

सवाई - राजस्थानच्या सवाई माधोपूर इथं हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. खंडार परिसरात राहणाऱ्या पतीने पत्नीची धारदार कुऱ्हाडीनं वार करून मारून टाकलं. पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री झोपलेल्या पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पतीने पोलीस स्टेशन गाठत पोलिसांसमोर सरेंडर केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय अशोक साहू हा मजुरीचं काम करायचा. रविवारी रात्री त्याचे पत्नी सुलोचनासोबत भांडण झाले. पत्नीने अन्य पुरुषाशी संबंध असल्याचा संशय अशोकला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नी झोपण्यासाठी खोलीत गेली. परंतु अशोकचा राग शांत झाला नाही. त्याने कुऱ्हाडी उचलली आणि बेडवर झोपलेल्या सुलोचनाच्या गळ्यावर वार करून तिला ठार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पतीने खंडार पोलीस स्टेशन गाठत पत्नीच्या हत्येची कबुली दिली. 

पोलिसांनी माहितीची खातरजमा करत आरोपी पती अशोकला ताब्यात घेतलं आणि घटनास्थळी पोलीस पथकाला पाठवले. त्याठिकाणी पत्नी सुलोचनाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सध्या अशोकची पोलीस चौकशी सुरू आहे. 

लग्नाच्या २६ व्या दिवशी पत्नीची हत्या
याआधी अजमेरमध्ये हत्येचे हैराण करणारं प्रकरण समोर आले होते. जिथे लग्नाच्या २६ व्या दिवशी पतीने पत्नीला चाकू भोसकून ठार केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली. घटनेनंतर काही वेळात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. आरोपी मुकेश केसवानीने २९ ऑक्टोबरला जेनिफर नावाच्या युवतीशी लग्न केले होते. 

शेजाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले की, लग्नानंतर पती-पत्नी खूप कमी वेळा घराबाहेर पडायचे. कुणाशीची जास्त बोलत नव्हते. बुधवारी दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा आवाज बाहेर लोकांना ऐकायला येत होता. परंतु काही वेळाने आवाज बंद झाला. दररोज होणाऱ्या भांडणामुळे लोकांनीही लक्ष दिले नाही. भांडणानंतर काही तासांनी मुकेश घरातून बाहेर गेला आणि २० मिनिटांनी पुन्हा परतला. त्यानंतर मोठं पोत घेऊन तो घराबाहेर पडला. ते पोत स्कूटरवर ठेवलं. परंतु पोतं फाटलं ज्यातून जेनिफरचा हात आणि केस बाहेर आले. जे पाहून लोक हैराण झाले. मुकेशनं तिथून पळ काढला पण शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. 
 

Web Title: In Rajasthan, Attacked wife with an ax in her sleep; Husband confessed to the murder before the police