पेट्रोल घेण्यासाठी तरुण पोहचला; दरावरुन बाचाबाची झाली अन् पंप मालकाने झाडली गोळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:51 PM2024-01-03T14:51:22+5:302024-01-03T14:58:58+5:30

तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

In Punjab, there was a dispute with a petrol pump owner over the price of oil. After an argument over this, the pump owner fired at the young man | पेट्रोल घेण्यासाठी तरुण पोहचला; दरावरुन बाचाबाची झाली अन् पंप मालकाने झाडली गोळी!

पेट्रोल घेण्यासाठी तरुण पोहचला; दरावरुन बाचाबाची झाली अन् पंप मालकाने झाडली गोळी!

पंजाबमधील फरीदकोट येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांग लागली होती. फरीदकोटच्या औलख गावात पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या तरुणासोबत पेट्रोल पंप मालकाची बाचाबाची झाली. यादरम्यान पंप मालकाने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीने गोळीबार केला. त्यामुळे गोळी तरुणाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री उशिरा घडली. पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी औलख गावातील फरीद किसान सेवा केंद्र पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा पेट्रोल पंप मालकाशी तेलाच्या दरावरून वाद झाला. यावरून वाद होऊन पंपमालकाने तरुणावर गोळीबार केला. त्यामुळे गोळी तरुणाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. तरुणाला उपचारासाठी फरीदकोट येथील जीजीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना काल फवारणी करायची होती, त्यामुळे पेट्रोलची गरज होती. मुलगा औलख गावातील पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आला होता. पेट्रोलच्या दरावरून पंप कामगारांशी वाद झाला. यावेळी पंपमालकाने आपल्या मुलावर गोळी झाडली. पंपमालकावर सुमारे ५ गोळ्या झाडल्या. यावेळी मुलगा अमरेंद्र सिंग याच्या पायाला गोळी लागली.

या घटनेबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी काय सांगितले?

गोळी लागल्याने अमरेंद्र जखमी झाला आणि खाली पडला, असे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर त्याच्या डोक्यावर पाईप आणि पिस्तुलाने वार करण्यात आले. मुलाच्या जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंपमालकावर कारवाई करावी. आम्हाला न्याय हवा आहे, अशी मागणी पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केली.

गोळीबाराच्या घटनेबाबत तपास अधिकारी काय म्हणाले?

याप्रकरणी तपास अधिकारी हरदेव सिंह यांनी सांगितले की, औलख गावातील पेट्रोल पंपावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आम्हाला आढळले की जवळच्या घनीवाला गावातील अमरेंद्र सिंग या तरुणाच्या पायात गोळी लागली होती, त्याला उपचारासाठी फरीदकोटच्या जीजीएस मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. जखमी तरुणाचे जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येईल. तेल भरण्यासाठी जादा दर मागितल्याने झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

Web Title: In Punjab, there was a dispute with a petrol pump owner over the price of oil. After an argument over this, the pump owner fired at the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.