क्रूर! बदला घेण्यासाठी ५ महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार, इतकेच नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:02 IST2023-03-16T13:01:26+5:302023-03-16T13:02:39+5:30
बलात्कारानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत बदला घेतल्याची पोस्टही लिहिली

क्रूर! बदला घेण्यासाठी ५ महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार, इतकेच नाही तर...
नवी दिल्ली - ओडिशाच्या नबरंगपूर इथं एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका आरोपीने ५ महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर निर्दयी आरोपीच्या पत्नीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. राजमिस्त्री हा पीडित महिलेचा शेजारी होता आणि तिच्या पतीसोबत काहीतरी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपीने त्याच्या गर्भवती पत्नीवर अमानुषपणे बलात्कार केला.
बलात्कारानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत बदला घेतल्याची पोस्टही लिहिली. सध्या या प्रकरणात ३८ वर्षीय मिस्त्री आणि ३५ वर्षीय पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता ही नात्याने आरोपीची वहिनी लागत होती. २८ फेब्रुवारीला ही दुर्दैवी घटना घडली परंतु मागील सोमवारी जेव्हा पीडितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही बाब पोलिसांसमोर उघड झाली. या प्रकरणात तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकारी दीपक कुमार यांनी म्हटलं.
ओडिशाच नव्हे तर अलीकडेच उत्तर प्रदेशातही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. याठिकाणी वृद्ध आजोबाने स्वत:च्या नातीवरच बलात्कार केला. त्यानंतर नातीला १० रुपये देत कुणालाही सांगू नकोस असं बजावलं. परंतु बलात्कार करताना गावातील एका व्यक्तीने पाहिले त्याने इतरांना ओरडून हे सांगितले. त्याठिकाणी लोक तिथे पोहचले आणि महिलांनी मिळून वृद्धाला बेदम मारले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली.