भावा-बहिणीनं विषप्राशन करून आयुष्य संपवलं; बेडरूममध्ये आढळले दोघांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:43 IST2025-02-12T06:43:10+5:302025-02-12T06:43:30+5:30
घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी आचोळे पोलिसांना दिली.

भावा-बहिणीनं विषप्राशन करून आयुष्य संपवलं; बेडरूममध्ये आढळले दोघांचे मृतदेह
नालासोपारा - एव्हरशाईन सिटी येथे राहणाऱ्या भावा-बहिणीने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे आचोळे पोलिसांनी सांगितले.
हनुमंता प्रसाद (वय ४०) आणि त्यांची बहीण यमुना प्रसाद (४५) हे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहत होते. दोघेही अविवाहित होते. हनुमंता मुंबईतील खासगी कंपनीत कामाला होता. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी आचोळे पोलिसांना दिली. पोलिसांनी दार उघडून आत प्रवेश केला असता बेडरूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले.