अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:46 IST2026-04-11T11:46:25+5:302026-04-11T11:46:49+5:30

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रियंकाचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. वडिलांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. आरोपी वडिलांनी मुलीचा मृतदेह घरातच ठेवला होता.

In Meerut No funeral for 6 months after daughter death; Police arrested Accused father | अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले

अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका वडिलांनी मुलीच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ६ महिने तिचा मृतदेह घरात लपवून ठेवला. बापाने ३ महिने मृतदेहावर परफ्यूम फवारून दुर्गंधी दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा सापळा एका खोलीत बंद करून फरार झाला. ही घटना समोर येताच पोलीसही हादरले.

माहितीनुसार, आरोपी उदय भानू विश्वास शिक्षण विभागात निवृत्त कर्मचारी आहेत. ते ३२ वर्षीय अविवाहित मुलगी प्रियंकासोबत राहत होते. जुलै २०२५ मध्ये प्रियंकाची तब्येत खराब झाली. तिला कावीळ झाली होती. हळूहळू तिची तब्येत ढासळत गेली परंतु वडिलांनी हॉस्पिटलला जाण्याऐवजी तंत्र मंत्राचा उपचार करण्यासाठी तिला मांत्रिकाकडे नेले. २ ऑक्टोबर २०२५ ला दसरा होता, त्यादिवशी नातेवाईकांनी प्रियंकाला अखेरचे पाहिले होते. त्यानंतर अचानक ती लोकांच्या नजरेतून गायब झाली. जेव्हाही कुटुंबाने उदय भानूकडे विचारणा केली तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

सप्टेंबर २०२५ मध्ये प्रियंकाचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. वडिलांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. आरोपी वडिलांनी मुलीचा मृतदेह घरातच ठेवला होता. ३ महिन्यापर्यंत या मृतदेहावर परफ्यूम फवारण्यात येत होते  जेणेकरून त्याचा दुर्गंध पसरू नये. जेव्हा डिसेंबरपर्यंत मृतदेहाचे हाडांच्या सापळ्यात रुपांतर झाले त्यानंतर आरोपीने एका खोलीत ते ठेवून फरार झाला. नातेवाईकांनी सातत्याने उदय भानूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०२६ मध्ये नातेवाईकांनी फोन केला तेव्हा मुलीला उपचारासाठी देहराडूनला आणल्याचं बापाने सांगितले. त्यानंतर त्याने नातेवाईकांचे कॉल उचलणे बंद केले, ज्यातून संशय बळावला. 

नातेवाईकांनी त्याला पकडले आणि घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती पोलिसांनाही दिली. पोलीस घटनास्थळी पोहचली तेव्हा बंद असलेल्या खोलीचा दरवाजा उघडताच आतील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. या खोलीत प्रियंकाच्या हाडांचा सापळा पडला होता. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावर केवळ काही केस आणि हाडांचे अवशेष बाकी होते. मुलीला उपचारासाठी मांत्रिकाकडे घेऊन गेलो होतो. तिला कावीळ झाली होती. परंतु योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिचा मृतदेह घरी ठेवल्याची कबुली आरोपी बापाने पोलिसांना दिली.

दरम्यान, पोलीस या घटनेची सर्व अँगलने चौकशी करत आहेत. प्रियंकाच्या मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला याची चौकशी करण्यात येत आहे. अंधश्रद्धेमुळे हा बळी गेला का याचाही शोध घेत आहेत. या घटनेत अन्य काही कारण आहे का यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. 

Web Title : अंधविश्वास का साया: पिता ने बेटी का शव 6 महीने तक रखा

Web Summary : उत्तर प्रदेश में एक पिता ने बेटी की मौत के बाद छह महीने तक शव छिपाया, दुर्गंध छिपाने के लिए परफ्यूम का इस्तेमाल किया। फिर अवशेषों को बंद कर फरार हो गया। पुलिस अंधविश्वास के कोण से जांच कर रही है।

Web Title : Superstition's Grip: Father Kept Daughter's Body for 6 Months

Web Summary : In Uttar Pradesh, a father concealed his daughter's body for six months after her death, using perfume to mask the smell. He then locked the remains and fled. Police are investigating possible superstitious motives.