३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:58 IST2025-06-06T16:57:49+5:302025-06-06T16:58:13+5:30

या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखम आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे पथक तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत

In Lucknow, 3-year-old girl kidnapped and raped; Accused in the rape case of a minor was shot dead by police in an encounter | ३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले

३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या आलमबाग परिसरात एका नराधमाला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये संपवला आहे. ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणारा आरोपी दीपक वर्मा हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. या आरोपीची माहिती देणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. २४ तासांत पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला यमसदनी धाडले आहे.

चंदन नगर परिसरातील आलमबाग मेट्रो स्टेशन पुलाखाली आई वडिलांसोबत झोपलेल्या ३ वर्षाच्या मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर क्रूर बलात्कार केला. बलात्काराने नराधमाने पीडितेला झाडात फेकून दिले. गुरुवारी सकाळी गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला घेऊन तिचे आई वडील लोकबंधू हॉस्पिटलला पोहचले. या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. प्राथमिक उपचारानंतर तिला केजीएमयूच्या पीडियाट्रिक सर्जरी विभागात उपचारासाठी नेले. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखम आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे पथक तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी दीपकची ओळख पटवली. त्याच्या अटकेसाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले. तपासात रस्त्यावर लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून दीपकच्या स्कूटीचा नंबर ट्रॅक करण्यात आला होता. 

कोण आहे आरोपी?

ऐशबाग परिसरात राहणारा दीपक वर्मा हा रेल्वेत पाणी विक्रीचे काम करत होता. बुधवारी रात्री दीपकने हे कृत्य केले. आई वडिलांसह फुटपाथवर झोपलेल्या ३ वर्षीय मुलीला त्याने तोंड दाबून तिथून पळवून नेले. काही अंतरावर जाताच त्याने मुलीवर बळजबरी केली. या प्रकारामुळे मुलीला जबर मानसिक धक्का बसला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका माणसाने तिच्या आई वडिलांना उठवले. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यातून आरोपीचा चेहरा स्पष्ट झाला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावर आरोपीने गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 

 

Web Title: In Lucknow, 3-year-old girl kidnapped and raped; Accused in the rape case of a minor was shot dead by police in an encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.