लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 10:05 IST2023-08-19T09:15:24+5:302023-08-19T10:05:21+5:30
गुरुवारी सायंकाळी ४ वाजताची ही घटना आहे. यामुळे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणींनी त्यांच्या नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सामाजिक संघटनांमधून होऊ लागली आहे.

लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले
सायबर सिटीम्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुग्रामच्या नाहरपूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमधून आणखी एका तरुणीला जीव धोक्यात घालावा लागला आहे. सेक्स करायला नकार दिला म्हणून संतापून लिव्ह इन पार्टनरने 28 वर्षीय तरुणीवर स्क्रू ड्रायव्हरने वार केले आहेत.
गुरुवारी सायंकाळी ४ वाजताची ही घटना आहे. यामुळे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणींनी त्यांच्या नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सामाजिक संघटनांमधून होऊ लागली आहे.
तरुणी दुपारी ४ वाजता तिच्या भाड्याने घेतलेल्या घरी होती. तेव्हा शिवम हा तिचा पार्टनर तिथे आला होता. त्याने तरुणीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तरुणीने विरोध केला असता तरुणाने तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. शिवम आणि ही तरुणी एक वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. शिवम लग्नाच्या बहाण्याने तरुणीचे लैंगिक शोषण करायचा. शिवमला अटक करण्यात आल्याचे एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितले आहे.
शिवमचे केवळ लग्न झालेले नाही, तर तिला दोन मुले देखील आहेत हे जेव्हा त्या तरुणीला समजले तेव्हा तिने त्यांच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. यासाठी तिने दुसरीकडे खोलीही घेतली होती. त्याठिकाणी गुरुवारी शिवम पोहोचला होता. शरीर संबंधाला तरुणीने जेव्हा विरोध केला तेव्हा त्याने तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. पीडितेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.