सासऱ्यासोबत होते शारिरीक संबंध, FB वर सापडला नवा मित्र; सूनेने रचलं षडयंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 14:53 IST2023-09-11T14:53:18+5:302023-09-11T14:53:27+5:30
सासऱ्याने इतके पैसे देण्यास नकार दिला. ज्यामुळे रागावलेल्या सूनेने सासऱ्याची हत्या केली.

सासऱ्यासोबत होते शारिरीक संबंध, FB वर सापडला नवा मित्र; सूनेने रचलं षडयंत्र
परदेशात जाण्यासाठी २ लाख रुपये देण्यास नकार दिल्याने एका महिलेने सासऱ्याची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. एका वृद्धाचा मृतदेह ५ सप्टेंबरला सापडला होता. मृतदेहावर मारहाणीच्या खूणा होत्या. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये वृद्धाचा मृत्यू एका मजबूत वस्तून डोक्यावर हल्ला केल्याने झाल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी घरच्यांची चौकशी केली. जेव्हा सूनेला पोलिसांनी चौकशीला बोलावले तेव्हा तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच तिने सासऱ्याची हत्या केल्याचे कबूल केले. हे प्रकरण गुजरातच्या डाकोर शहरातील आहे.
पोलिसांनी या हत्येबद्दल माहिती देताना सांगितले की, ७५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव जगदीश होते. जो सूनेसोबत शारिरीक संबंध होता आणि ही गोष्ट इतरांपासून लपवण्यासाठी तिला पैसे देत राहिला. खूप काळ या दोघांमध्ये संबंध होते. त्यात सूनेने फेसबुकवर अन्य एकासोबत अफेअर सुरू केले. त्याला भेटण्यासाठी तिला परदेशात जायचे होते. परदेशात जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून तिने सासऱ्याकडे २ लाखांची मागणी केली. सासऱ्याने इतके पैसे देण्यास नकार दिला. ज्यामुळे रागावलेल्या सूनेने सासऱ्याची हत्या केली.
३ दिवस मृतदेह लपवला
या हत्येनंतर सूनेने तब्बल ३ दिवस सासऱ्याचा मृतदेह लपवून ठेवला. जगदीश ३ दिवस बेपत्ता असल्याने कुटुंबाला चिंता लागली. कुटुंबातील मोठ्या मुलाने राजस्थानच्या नातेवाईकांकडेही चौकशी केली. परंतु वडिलांचा शोध लागला नाही. कुटुंब चिंतेत पडले होते. अशावेळी घरच्या अलमारीत जगदीश यांचा मृतदेह सापडला. या घटनेने कुटुंबाला धक्का बसला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला.