राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 22:18 IST2025-08-20T22:17:46+5:302025-08-20T22:18:06+5:30
घरात एकूण ४ जण राहत होते. हत्या आई वडील आणि भावाची झाली आहे. आईचा मृतदेह पहिल्या मजल्यावर तर दोघांचा खाली जमिनीवर पडलेला आढळला.

राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या मैदानगडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका आरोपीने स्वत:च्या आई वडिलांची आणि भावाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं समोर आले. या तिहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली आहे.
माहितीनुसार, मंगळवारी दुपारी या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे अधिकारी कर्मचाऱ्यांना एकाच घरात ३ मृतदेह सापडले. आरोपी हा मृत जोडप्याचा मुलगा होता. आरोपीने आई वडील आणि छोट्या भावाची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना पीसीआरवर कॉल आला, एका मुलाने स्वत:चा हात कापला आहे. खूप रक्त वाहतंय त्याला मदत हवीय. ही माहिती मिळाली तेव्हा तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. घरात प्रवेश करताच पोलिसांना रक्तबंबाळ अवस्थेत २ मृतदेह आढळले तर घराच्या पहिल्या मजल्यावर एका महिलेचा मृतदेह होता. ५० वर्षीय प्रेम सिंह, ४५ वर्षीय रजनी आणि २४ वर्षीय ऋतिक अशी या मुलांची नावे आहेत.
या घटनेचा तपास केला तेव्हा घरातील मृत जोडप्याचा मुलगा सिद्धार्थ गायब असल्याचे कळले. पोलिसांनी माहिती घेतली त्यात सिद्धार्थवर मानसिक उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात सिद्धार्थने एकाला सांगितले, मी कुटुंबाची हत्या केली असून आता मी इथं राहणार नाही हे बोलला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. घरात एकूण ४ जण राहत होते. हत्या आई वडील आणि भावाची झाली आहे. आईचा मृतदेह पहिल्या मजल्यावर तर दोघांचा खाली जमिनीवर पडलेला आढळला.
दरम्यान, आरोपी सिद्धार्थ मानसिक रुग्ण आणि नशेचे व्यसन असलेला आहे. व्यसनापायी तो दररोज घरात भांडण करत असायचा. आरोपीने धारदार शस्त्राने आई वडील आणि छोट्या भावावर हल्ला केला. या घटनेने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. तर नुकतेच दिल्लीतील आस्था कुंज परिसरात मूक बधिर व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. यात ४ जणांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये १८ वर्षीय आरोपीचा समावेश आहे तर १ महिला आणि २ अल्पवयीन आरोपी आहेत. आरोपी पार्कमध्ये आले होते. तेव्हा मृत व्यक्तीने त्यांना टक लावून पाहिल्याने आरोपींनी लाठीकाठी आणि दांडक्याने त्याला मारहाण केली.