थरारक! शंभू नको, तिला पप्पू हवा; पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला जिवंत पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:21 IST2023-06-13T16:20:54+5:302023-06-13T16:21:43+5:30
गावकऱ्यांनी शंभूला आगीत जळताना पाहून त्याला वाचवले. शंभूचे शरीर खूप भाजल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

थरारक! शंभू नको, तिला पप्पू हवा; पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला जिवंत पेटवले
मुजफ्फरपूर - बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये कलयुगी पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. सध्या पतीचा प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी जखमी पतीच्या तक्रारीवरून पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांविरोधात जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
हे प्रकरण साहेबगंज परिसरातील वासुदेवपूर सराय गावातील आहे. याठिकाणी २५ वर्षीय शंभू राय त्याच्या पत्नीसोबत राहत होता. शंभूने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, माझ्या पत्नीचे पप्पू नावाच्या युवकासोबत अफेअर सुरू होते. जेव्हा मला ही गोष्ट कळाली तेव्हा मी त्याचा विरोध केला. त्यावरूनच पत्नी वारंवार माझ्यासोबत वाद घालत होती. आमच्या दोघांत या विषयावरून अनेकदा भांडण झाले.
त्यानंतर शनिवारी रात्री अचानक पप्पू शंभूच्या घरात घुसला. त्यावेळी शंभू झोपेत होता. तेव्हा पत्नी आणि पप्पूने मिळून शंभूला मारहाण सुरू केली. त्यानंतर घराबाहेर घेऊन जात एका झाडाला बांधले. इतकेच नाही तर केरोसिन अंगावर फेकून आग लावली. या आगीत शंभू गंभीररित्या जखमी झाला. रात्री काही गावकऱ्यांनी आग पाहून त्याठिकाणी धाव घेतली तोपर्यंत शंभूची पत्नी आणि प्रियकर पप्पू दोघेही तिथून फरार झाले होते. गावकऱ्यांनी शंभूला आगीत जळताना पाहून त्याला वाचवले. शंभूचे शरीर खूप भाजल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. शंभूची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला एसकेएमसीएच रुग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेबाबत पोलीस अधिकारी हरेंद्र राम यांनी सांगितले की, सध्या जखमी पतीच्या जबाबावरून पत्नी आणि तिचा प्रियकर पप्पू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सध्या या दोघांची चौकशी सुरू असून पुढील पोलीस तपास केला जात आहे.