शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२ महिन्यापासून सासरीच होता, एके रात्री डोकं फिरलं; पतीनं पत्नीसह मेहुणीलाही जीवे मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 17:23 IST

दीपकनं अचानक पत्नी आणि मेहुणीवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.  

पटणा - बिहारची राजधानी असलेल्या पटण्यात बिगहा गावात एका पतीने पत्नी आणि मेव्हणीवर गोळीबार केला. त्यात मेहुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेतील जखमी पत्नीला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रविवारी ही घटना घडली तेव्हा आसपासच्या लोकांनी फोन करून पोलिसांना बोलावले. सध्या दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३२ वर्षीय दीपक कुमार आणि मेहुणी गुडिया देवी हिचा समावेश आहे. दीपकने मृत्यूपूर्वी पत्नी लक्ष्मीदेवी हिच्यावरही गोळी झाडली. जी गोळीबारात जखमी झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ एक पथक घटनास्थळी पोहचले. तिथे दीपक कुमार आणि त्याची मेहुणी यांचा गोळीने मृत्यू झाल्याचं आढळलं. मात्र जखमी पत्नीला तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे.

काय आहे प्रकरण?

दीपक आणि गुडिया देवी यांचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला आहे. दीपक आणि त्याची पत्नी यांच्यात वैवाहिक वाद होते. मागील २ महिन्यापासून दीपक त्याच्या सासरी राहत होता. रविवारी रात्री काही कारणांवरून वादाचं रुपांतर गोळीबारात झाले. दीपकनं अचानक पत्नी आणि मेहुणीवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.  घटनास्थळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक आणि कारतुसे जप्त केली आहेत. 

दरम्यान, घटनेच्या वेळी सासू शेतात काम करत होती. परंतु गोळीचा आवाज ऐकून ती घराकडे धावत आली. त्याठिकाणचं दृश्य पाहून तिला धक्का बसला. शेजाऱ्यांच्या मदतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नुकतेच गुडिया देवीचं लग्न झालं होते. तिचा नवरा गुजरातमध्ये मोलमजुरी करतो तर लक्ष्मीदेवीचं लग्न दीपकशी ३ वर्षापूर्वी झालं होते. त्यांना २ वर्षाचा मुलगा होता तर लक्ष्मी ८ महिन्याची गर्भवती होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी