भिवंडीत भांडणाच्या रागातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला, महिला गंभीर जखमी

By नितीन पंडित | Updated: September 12, 2022 17:09 IST2022-09-12T17:09:07+5:302022-09-12T17:09:55+5:30

वैभव पवार याने किरणची वहिनी कविता माने तिच्या उजव्या कानाखाली मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

In Bhiwandi, a woman was attacked with sharp weapon out of anger, the woman was seriously injured | भिवंडीत भांडणाच्या रागातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला, महिला गंभीर जखमी

भिवंडीत भांडणाच्या रागातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला, महिला गंभीर जखमी

भिवंडी - भिवंडी शहरातील नारपोली या ठिकाणी मागील भांडणाचा राग मनात धरून व आपल्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका सराईत गुन्हेगाराने महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना रविवारी घडली आहे. कविता माने असे या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नारपोली परिसरातील साठे नगर रामनगर या भागात राहणारा किरण माने याचे परिसरातील सराईत गुन्हेगार वैभव गोपाळ पवार यांची मैत्रीण जयश्री कांबळे हिच्या सोबत गणेश विसर्जन मिरवणूक प्रसंगी भांडण झाले होते.त्या भांडणाचा व नारपोली पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून आरोपी वैभव याने किरण माने यास मारहाण व शिवीगाळ करून धमकावले होते. त्यानंतर आरोपी वैभव याने पुन्हा किरण याची पत्नी कौशल्य व वहिनी कविता यांच्या सोबत झालेल्या प्रकारा वरून दुसऱ्या दिवशी बाचाबाची झाली. 

वैभव पवार याने किरणची वहिनी कविता माने तिच्या उजव्या कानाखाली मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी किरणचा भाऊ रवींद्र शिवाजी माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी वैभव पवार या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केले आहे. वैभव पवार हा सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगारा असून त्यास यापूर्वी बॉण्डवर सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान परिसरात गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: In Bhiwandi, a woman was attacked with sharp weapon out of anger, the woman was seriously injured